महाराष्ट्र ट्रायबल न्युज

साईराज ग्रुप संस्थे तर्फे पिंपळसोंड जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

बोरगाव l प्रतिनिधी:-  आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साईराज ग्रुप नाशिक ह्यांच्यातर्फे पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
       तालुक्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागातील पिंपळसोंड,उंबरपाडा पी, खुंटविहिर,चिंचमाळ,बर्डा ची या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य - दप्तर,स्वेटर,वह्या, स्टेशनरी साहित्य,खेळाचे साहित्य,छत्री आणि गोड मिठाईचे वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हतबल ठरतात .त्या अनुषंगाने सामाजिक संस्था साईराज ग्रुप तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साईराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टोपले,रविंद्र गायकवाड,राकेश ठाकरे,रोशन चिंचले, संदीप पवार ,सुनिल गवळी, प्रकाश मोंढे,गणेश नाठे , दुर्वादास गायकवाड,रतन चौधरी आदी उपस्थित होतें.मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शालेय गरजेपयोगी साहित्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र भोये , उपशिक्षक प्रविण पवार , शाळा.व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल ,उषा खोटरे , ओमिका गावित व सहभागी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
पिंपळसोंड ता. सुरगाणा येथे आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना साईराज गृप सामाजिक संस्थेचे सदस्य.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने