महाराष्ट्र ट्रायबल न्युज

संकल्प आदियुवा संघटनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन शिबीर पेठ येथे संपन्न

पेठ l प्रतिनिधी:- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शैक्षणिक करिअर संदर्भात मार्गदर्शनासह *विद्यार्थी गुणगौरव सोहळा* कार्यक्रम दि.12 जुलै -2025 रोजी दादासाहेब बीडकर महाविद्यालय पेठ येथे उत्साहात पार पडला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्येकर्ते व कृषीभूषण मा.यशवंत गावंडे हे होते तर कार्यक्रमाचे उद्दघाटन सामाजिक कार्येकर्ते *मा.गोकुळभाऊ झिरवाळ* यांच्या हस्ते करण्यात आले.
          करियर विषयक मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये बीडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.नरेद्र पाटील सर , रुद्रा अँकेडमीचे प्रा.निलेश चौधरी सर, ननाशी शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ.एच जे.बावा सर, सामाजिक कार्येकर्ते गणपत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे मा.सभापती कृ.उ.बा.समितीचे शाम गावित , मा.उपसभापती महेश टोपले, यशोदिप मंडळाचे रमेश चौधरी , गिरीषभाऊ गावित , अमोल पाटील सर, आदिवासी कर्मचारी-अधिकारी संघटनेचे उत्तम झिरवाळ, दशरथ भुसारे , उलगुलान शिक्षक संघटनेचे दिलीप भुसारे, माणकेश्वर फाऊंडेशन गणेश वाघमारे आदी उपस्थित होते
          कार्यक्रमात 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात पदवीप्राप्त गुणवंतांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
         कार्यक्रमाचे सूत्र संचालन चेतन खंबाईत यांनी केले तर संकल्प संघटनेचे तालुकाध्यक्ष गौरव चौधरी यांनी सर्वाचे आभार मानले.
       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्पचे टीमचे पदाधिकारी कांतीलाल नाठे, किरण खंबाईत, राजेंद्र गांगोडे,अनिल जाधव ,मधुकर पाडवी, राजू जाधव , कांतीलाल मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने