महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*विपश्यना केंद्राची नियोजित जागा जर शासनाने रद्द केली तर तीव्र आंदोलन. दिंडोरी येथील लोकप्रतिनिधींचे तहसिलदारांना निवेदन.

दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची कर्मभूमी असून येथे सामाजिक न्याय विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र बुद्ध विहार शासकीय जागेवर मंजूर झाले आहे .तथापि या जागेवर दुसरा प्रकल्प लादण्याचा डाव प्रशासन करीत असल्याची चर्चा आहे. विपश्यना केंद्राची नियोजित जागा जर शासनाने रद्द केली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिंडोरी येथील लोकप्रतिनिधींनी दिला आहे. याबाबत तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
    दिंडोरी ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जन्मभूमि तसेच कर्मभूमि आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या विचाराने प्रेरित होवून दिंडोरी तालुक्यात सामाजिक समतेची चळवळ सुरु आहे. त्याच पार्श्‍वभूमिवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेची समतेची मुल्य पसरवण्यासाठी तसेच भगवान गौतम बुद्धांचा शांतीचे तत्वज्ञान जगभरात पोहचवण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र. 10 येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्ध विहार मंजूर झाले असून त्याचे काम सुरु आहे. या कामामुळे दिंडोरीचा विकास होणारच आहे परंतू राज्यातील तसेच देशातील अनेक जिज्ञासु दिंडोरी येथे येण्यास इच्छुक आहेत. तथापि सदरची जागा दुसर्‍या कोणत्या तरी प्रकल्पाला देण्यात येणार असल्याचे चर्चा ऐकीवात आली आहे. तरी सदरील जागेवर होणारे बुध्द विहाराचे काम रद्द केल्यास राज्यभर आंबेडकरी अनुयायांमध्ये संताप व्यक्त होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सदरील जागा ही आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र , उद्यान,वाचनालय ,बुध्द विहारासाठीच वापरावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकप्रतिनिधी दिला आहे. यावेळी रमेश बोरस्ते,कैलास मवाळ ,अविनाश जाधव ,माधवराव साळुंखे,भाजप शहराध्यक्ष नगरसेवक नितीन गांगुर्डे, रमेश बोरस्ते, सुजित मुरकूटे, श्रीकांत सांळूखे, हेमंत पगारे, मनोज मवाळ, विजय कराटे, श्याम गवारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने