महाराष्ट्र ट्रायबल न्युज

करंजुल (पे) शाळेतील विद्यार्थ्यांना सुभाष जाधव यांच्या कडून गणवेश वाटप

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजुल (पे ), येथील विद्यार्थ्यांना गावातील सुभाष जाधव यांच्याकडून आदर्श शाळा उपक्रम अंतर्गत रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस, ब्लू हाऊस या चार प्रकारचे ड्रेस वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रथम इन्फोटच फाउंडेशन कडून शाळेला टीव्ही भेट देण्यात आला.
     या कार्यक्रमाप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष रमेश वाघमारे, संगिता वाघमारे,ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा जाधव, पो.पा. पुंडलिक जाधव, मुरलीधर वाघमारे, दत्तू जाधव, मुख्याध्यापक तुषार चौरे, सहशिक्षक हेमंत वाघेरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने