बाऱ्हे l नामदेव पाडवी :- गुजरातच्या डांग जिल्ह्यातील वघई सापुतारा रस्त्यावरील अंबिका नदीवरील पुल वाहतुकीसाठी दि.१४/०७/२०२५ पासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सापुतारा व नाशिक या मार्गे येणारी वाहने बोरगाव सुरगाणा बर्डीपाडा वासदा मार्गे वळविण्यात आलेली आहेत. असे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग कळवणचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, उप अभियंता जे. एम. वाघ, कनिष्ठ अभियंता जितेंद्र सातदिवे, सहाय्यक अभियंता हेमंत बागुल यांनी दिली आहे.
तथापि महाराष्ट्र राज्यातील बर्डीपाडा रस्त्यावरील गुजरात राज्यातील बिलमोडा जवळील कावेरी नदीवरील पुल हा एकेरी वाहतुकीचा असून तो कमकुवत झाल्याने दि.१५/०७/२०२५ पासून सदर पुलावरून सुद्धा अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्याबाबत जिल्हा मॅजिस्ट्रेट नवसारी यांनी दि.११/०७/२०२५ रोजीच्या अधिसुचनेनुसार कळविले आहे की खालील प्रमाणे
फोटो- बर्डीपाडा जवळील गुजरात राज्यातील बिलमोडा कावेरी नदीचा कमकुवत पुल असल्याने अवजड वाहनांकरीता प्रवेश निषिद्ध करीता लावलेले हाईट्स बार..