महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिडोरी तालुक्यात मोफत कर्करोग तपासणी मोहीम – नागरिकांना विशेष आवाहन

दिंडोरी l प्रतिनिधी:- दिडोरी तालुक्यातील नागरिकांना कळवण्यात येथे की,
दि. 23 जुलै 2025 रोजी (बुधवार) प्राथमिक आरोग्य केंद्र उमळारे आणि दिनांक 24 जुलै 2025 रोजी (गुरुवार) प्राथमिक आरोग्य केंद्र ननाशी येथे कर्करोग निदानासाठी खास कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे नागरिकांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
    ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोहीम आरोग्य विभाग, नाशिक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.
    या व्हॅनमध्ये तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या आजारांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. संशयित रुग्णांची नंतर बायोप्सी करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
    सदर मोहिमेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, डॉ. संदीप सूर्यवंशी, डॉ. हर्षल नेहते, डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. दीपक लोणे, डॉ. राहुल हडपे हे अधिकारी विशेष प्रयत्न करणार आहेत.

व्हॅनमधील प्रमुख सुविधा:

दंतचिकित्सक आणि डेंटल चेअर

कॅन्सर तपासणीसाठी अत्याधुनिक साधने

स्त्रियांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष

स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी कोलको स्कोपी

स्टाफ नर्स, लॅपटॉप, पाणी व वीज सुविधा


🗓️ महत्त्वाच्या तारखा:

23 जुलै 2025 (बुधवार): पीएचसी उमळारे

24 जुलै 2025 (गुरुवार): पीएचसी ननाशी


🩺 संपूर्ण तपासणी व उपचार मोफत!

ग्रामीण रुग्णालय, दिडोरी मार्फत सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, ही एक महत्त्वाची संधी असून सर्वांनी तपासणी करून घ्यावी व कर्करोगापासून संरक्षण मिळवावे.

📣 "आपले आरोग्य, आपली जबाबदारी!"
सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने