महाराष्ट्र ट्रायबल न्युज

विद्यार्थिनी अत्याचारांबाबत निनीशा करते जनजागृती

दिंडोरी । मनोज पाटील:- सध्याच्या काळात सुरू असलेले विद्यार्थिनी फसवणूक, अत्याचार त्याचप्रमाणे लैंगिक समस्या याविषयी विद्यार्थिनी मध्येच जनजागृती व्हावी, यासाठी सोळा वर्षीय निनीशा रत्नाकर चुंभळे हिने पुढाकार घेतला आहे. आदिवासी भागात लैंगिक शिक्षणाचा पाठ ती देत आहे. आदिवासी भागातील मुलींना जागृत करण्याच्या निनीशाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ कौतुक करीत आहे.
    निनीशा रत्नाकर चुंभळे हिच्या अन्वया इनिशियेटिव या सामाजीक संस्थेमार्फत बारावीपर्यंतच्या किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक हिंसाचार याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. सध्या भारतात सर्वत्र लैगिक हिंसाचाराविषयी वाईट गोष्टी घडत आहे. म्हणून निनीशा चुंभळे हिने स्वयंस्फूर्तीने आपल्या 16 वर्षीपासून उपक्रम सुरु केला आहे. सध्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंंबकेश्‍वर या आदिवासी भागात निनीशा चुंभळे काम करत आहे. यशोदामाता माध्यमिक विद्यालय गौळाने, दे. ना. पाटील विद्यालय गंगापूर व ज्युनिअर कॉलेज, ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालय विल्होळी, शासकीय कन्या शाळा जिल्हा परिषद नाशिक, जि.प.शाळा गिरणारे, धोंडेगाव, शास्त्रीनगर, सांप्रदाया पाठशाळा, सिन्नर (मोंट) जि.प.शाळा या सर्व शाळेमध्ये जावून 7500 विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण आणि लैंगिक अत्याचारा विरोधात संरक्षण कसे करायचे? याबाबत निनीशा हिने मार्गदर्शन केले . 6 मिनिटांचा रीळ बनवून तीने शाळांमध्ये दाखवला आहे. तिने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल यांना दाखवला त्यांना तो फार आवडला व तिने प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखवण्याची विनंती केली. त्यास त्यांनी होकार दिला आहे. त्यानुसार कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, मुंढेगाव येथे प्रात्यक्षिक दाखवले. तिने लैंगिक हिंसाचार, शोषण, अत्याचार आणि संरक्षण कसे करायचे याचे मार्गदर्शन केले. स्वतः चे संरक्षण ही काळाची गरज आहे आणि 400 विद्यार्थीनीना तिने मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे मुंढेगावचे श्रीमती कट्यारे, त्र्यंबक (पत्र्याचापाडा) येथील श्रीमती आहिरे, पेठच्या श्रीमती भदाणे, सुरगाण्याच्या श्रीमती गांगोडे यांच्यासह शिक्षकांनी निनीशा चुंभळे हिचे अभिनंदन केले आहे. तिच्याबरोबर खंबीरपणेउभे असलेल्या तिचे आई माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री रत्नाकर चुंभळे, वडील रत्नाकर चुंभळे यांचेही आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने