महाराष्ट्र ट्रायबल न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन

दिंडोरी l मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यात अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या शेतीपिकांचे झालेले नुकसान भरपाई व पूर्णता कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वणी- पिंपळगाव महामार्गावर खेडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
दिंडोरी तालुक्यात अडीच महिने सततच्या अवकाळी, अतिवृष्टी, वादळे व वारे यासारख्या नैसर्गिक संकटांनी शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागा, कांदा, डाळिंब, पपई, केळी, पेरू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, नागली, उडीद, मूग, भात, भुईमूग या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकर्‍यांचा प्रामुख्याने भाजीपाला, फळभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात सडून नुकसान झालेले आहे. अतिवृष्टी व अवकाळीच्या फटक्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन मध्य व अल्पभूधारक शेतकरी पूर्णपणे हवालदिल व कर्जबाजारी झाला आहे. तसेच मागिल कोरोना काळात झालेले द्राक्ष व इतर फळ उत्पादन शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान व आताची नैसर्गिक हानीमुळे झालेले नुकसान त्यातच शेतीसाठी राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था व सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेली कर्जाची सक्तीची वसुली या सर्व बाबींमुळे शेतकरी पूर्णपणे संकटात असून हवालदिल झाला आहे. तरी राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी पतसंस्था व सहकारी सोसायटी यांच्याकडून घेतलेली कर्जाची सक्तीची वसुली तात्काळ थांबवून शेतकरी बांधवांची पूर्णता कर्जमाफी करावी तसेच झालेल्या शेती मालाची नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने वणी- पिंपळगाव महामार्गावरील खेडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार ढुमसे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी केंद्र व राज्य सरकार टिका केली. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दिड तास वाहतूक कोंडी झाली होती. याप्रसंगी संतोष रहेरे, नदीम सैय्यद, अतुल पाटील, अमोल पाटील, भगवान जाधव, सुनील पाटील, शांताराम बार्‍हाते, विजयं डोखळे, बशीर शहा, ज्ञानेश्‍वर रणदिवे, दीपक रणदिवे, संदीप पवार, दीपक ठुबे, शांताराम दवंगे, दीपक तिडके, सोमनाथ लहीतकर, निलेश पवार, बाळासाहेब पाटील, जनार्दन ढोकरे, अंबादास बार्‍हाते, राजेंद्र गांगुर्डे आदी शेतकरी उपस्तित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने