सुरगाणा l कृष्णा पवार:- जिल्हा परिषद शाळा सतखांब ता.सुरगाणा जि. नाशिक ही एक आदिवासी भागांमध्ये चांगली शिक्षण देणारी शाळा आहे.अनेक विद्यार्थी ,विद्यार्थिनी शिक्षण घेत असतात शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं हे ओळखून सतखांब येथील रहिवाशी कैलास भागवत गावित यांच्या पुढाकाराने सामाजिक दायित्व दाखवून अधिकारी वर्गाने धनराज गावित, कौतिक दुमसे, अनिता जयराम गावित, वर्षा दीपक गावित ,सुनीता कैलास गावित, भाऊकिशन गावित ,वैभव चौरे,परमेश्वर वायकर , ललित भोये ,भास्कर कुवर यांच्या सर्वांच्या मदतीच्या साह्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.उषाताई रविंद्र भोये, सौ. हिराबाई हरी चौरे , मुख्याध्यापक श्री.राठोड सर, श्रीमती.चंद्रकला चौरे मॅडम व इतर कर्मचारी उपस्थित होते. साहित्य वाटप झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला हा आनंद पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी सर्व देणगीदार अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.