पेठ । प्रतिनिधी:- पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले.
यावेळी महसुल विभागातील इंदीरा गांधी, संजय गांधी योजनेतील 7, वृद्धापकाळ 7, दिव्यांग 3, श्रावणबाळ 3, राष्ट्रीय सहाय्य योजने अंतर्गत एकरकमी विसहजार अर्थसहाय्य - 8, ई शिधापत्रिका 16 , नविन मतदार ओळखपत्र 18, वारस नोंदी 40, जातीचे दाखले 25, उत्पन्न 30, रहिवास 3, डोमासाईल 21 व इतर 4 आरोग्य विभागातर्फे आभा कार्ड , गोल्डन कार्ड 69, मेडीकल तपासणी 85, सिकलसेल 85, पंचायत समिती तर्फे भुईमुग, तूर, उडीद बियाणे 6, घरकुल चावी वाटप 10, तूती लागवड, सिंचन विहीरी व जॉब कार्ड 18, महिला बचत गट बॅक चेक वाटप 5, जन्म दाखले 10 एकुण 49 कृषी विभागातर्फे आत्मा गट नोंदणी, ग्रीस्टीक, नागली मिनीकीट, शेततळे अस्तरीकरण यांची 50 दाखले तर एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्याकडील 26 बेबी केअर किट वाटप करण्यात आले. या शिबिरास नगराध्यक्ष करण करवंदे, माजी पं . स . सभापती विलास अलबाड, माजी सभापती श्याम गावीत, महेश टोपले यांच्यासह विभागप्रमुख व लाभार्थी उपस्थित होते. तहसिलदार आशा गांगुर्डे व इतर विभागाचे विभाग प्रमुख व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.