maharashtratribalnews

दिंंडोरीचे माजी आमदार धनराज महाले पायी दिंडीत सहभागी

                                                                                  दिंडोरी । मनोज पाटील:- दिंंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी पायी दिंड्याचे स्वागत केले असून स्वत:ही दिंड्यांमध्ये सहभागी झाले. 
    सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा खेडगाव, शिंदवड, जोपुळ व शिवरपाडा या गावातील हजारो भक्तगण श्री निवृती महाराजांच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळामध्ये सहभागी होतात. त्यांना दरवर्षी त्यांच्या भेटीसाठी, दर्शनासाठी व विचारपूस करण्यासाठी माजी आमदार धनराज महाले सहभागी होत असतात. यावेळी संपर्कप्रमुख सुनील पाटील,वैभव महाले, उत्तम जाधव,  योगेश दवंगे, माधव उगले, नंदू बोंबले, गणेश दवंगे, पप्पू राऊत, नवनाथ महाले, बाळु मामा भोये, रवी जोपळे, विजय जोपळे, सुदाम तुंगार, शांताराम दवंगे, शंकर दवंगे, तुषार गांगोडे, माणिक कुंभार, वरुण महाले,अनिकेत दिवटे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने