दिंडोरी l मनोज पाटील :-दिंडोरी येथील अल्पवयीन मुलीवर केलेल्या अतिप्रसंगासदंर्भाने दाखल गुन्ह्यात आरोपीस जन्मठेप व १ लाखांचा दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिंडोरीत एका अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई वडीलां सोबत शिवाजी नगर येथे राहत असतांना सुमारे २०१९ मध्ये पिडीत ही इयत्ता ३ री मध्ये असतांना ती शिकवणी घेणे कामी आरोपीचे घरी जात होती. तेव्हा आरोपी संतोष कुमार श्री मनुलाल सैनी वय. ५८ वर्षे धंदा. नोकरी रा. शिवाजी नगर ता. दिंडोरी जि. नाशिक मुळ रा.पोस्ट कैथा ता. घाटनपुर जिल्हा. कानपुर राज्य उत्तर प्रदेश याने पिडीत ही बालक आहे हे माहित असतांनाही तिचे सोबत शारिरीक संबंध केले व धमकी दिली जर कोणाला सांगीतले तर पुन्हा तुझे सोबत शारिरीक संबंध करणार तेव्हा पासुन सुमारे ऑक्टोबर २०२३ पावेतो वेळोवेळी पिडीते सोबत शारिरीक संबंध केले आहे. सदर संबंधामुळे पिडित हि गरोदर झाली ज्याबाबत तिला समजले नाही. व तीने घरच्यांना सांगीतले नाही. पिडितेस दि.१६ जानेवारी २०२४ रोजी स्त्री जातीचे बाळ झाले त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास दिंडोरी पोलीस ठाणेकडील तात्कालीन महीला पोलीस उप निरीक्षक मोनीका जेजोट व पो हवा १९९३ कमलेश अरूण देशमुख यांनी केलेला असुन, आरोपी विरूद्ध सबळ पुरावे झाल्यानंतर दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले आहे.
सदर गुन्हंयाची सुनावणी मा. न्यायाधीश श्रीमती. पी. व्ही. घुले साो जिल्हा व अति. सत्र न्यायालय कं.५ यांच्या न्यायालयात झाली असुन फिर्यादीच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती लिना चंद्रकांत चव्हाण मॅडम यांनी बाजु मांडली असुन, आरोपीच्या वतीने आरोपीच्या वकीलाने मा. न्यायालयात बाजु मांडली. मा. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे ऐकुण घेवून साक्षीदार व भौतीक पुरावे तपासुन आरोपीविरूद्ध पुरावा मिळुन आल्याने मा. न्यायालयाने आरोपी यास भादविक. ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (एन) व पोक्सो ६ मध्ये आरोपी यास जन्मठेप हि शिक्षा व १,००,०००/- रू. दंड, दंड न भरल्यास २ वर्ष साधी कैद दंडाच्या रकमेच्या अर्धी रक्क्म ५०,०००/- हे अपील कालावधी नंतर पिडीतेला देण्यात यावे अशी शिक्षा सुनावली आहे. सदर सुनावणीचे पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा/५०३ सुजीत सुधाकर इंगळे यांनी काम पाहिले आहे.