दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उत्तम जाधव यांचे दोन्ही मुले आता निराधार झाले असून आई-वडिलांचा आधार गेला आहे. त्यामुळे दोन्ही मुलांना आता मदतीची गरज असून जाधव कुटुंब उघड्यावर आले आहे.
परवा मध्यरात्री दिंडोरी येथे सीड फार्मजवळ झालेल्या अपघातात सात मृत्यूमुखी पडले. त्यात उत्तम जाधव व त्यांच्या पत्नी अलका उत्तम जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांना अखिल व अमोल हे दोघे मुले आहेत. पूर्ण घरात हे चौघे राहायचे. आता पती-पत्नीच्या निधनानंतर हे दोघेही आपल्या मातृ पितृ सुखाला वंचित झाले आहे. दोघांची शाळा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मागील वर्षी सोडले. घरातील चौघेही मोलमजुरी करून पोट भरायचे. त्यांचे घर हे आजोबांच्या नावावर आहे. त्याचबरोबर थोडीफार शेती आहे ते सुद्धा आजोबांच्या नावावर आहे. मागील वर्षी दोघांचे शिक्षण सुटले. आता यावर्षी तर आई-वडिलांचे प्रेमच तुटले. एक आईचा आणि वडिलांचा मायेचा हात त्यांच्या डोक्यावर असल्याने त्यांना कधी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली नव्हती. पण आता या पुढील काळात त्यांचा संघर्षाचा राहणार आहे. कारण स्वयंपाक करून देणारच घरात कोणी राहिले नाही. इतर नातेवाईक त्यांना मदत करत आहेत. परंतु पुढील काळ जसा जाईल तसा दोघांना अडचणी वाढणार आहे. त्यांना मदत करावी अशी गावकर्यांची भावना आहे. शासन काय मदत करेल किंवा नाही करेल ही गोष्ट वेगळी आहे. शक्यतो अशा अपघातांमध्ये शासन मदत करत नाही. त्याच दिशेने सर्वांची वाटचाल सुरू आहे. तथापि एक माणूस याचा विचार म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास कहाने यांनी मदतीचे आवाहन केले आहे. अशा दुःखद प्रसंगात अमोल व अखिल यांना सामाजिक जाणीव असणार्या दात्यांनी मदत करावी ते मदत त्यांच्या बँक खात्यावर करावी जेणेकरून त्यांना पुढे हातभार लागेल अशी अपेक्षा विश्वास कहाने यांची आहे. दोघांचेही कोशिंबे येथील युनियन बँकेच्या शाखेत खाते असनून कोणाला मदत करायची असल्यास त्यांनी अखिल उत्तम जाधव खाते क्र. 520481033310878 किंवा अमोल उत्तम जाधव खाते क्र. 520481033306781 या खात्यांवर करावे, असे आवाहन विश्वास कहाणेे , डॉ. अनिल सातपुते, गोपीनाथ गांगोडे पाटील, दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केले आहे.