बाऱ्हे l नामदेव पाडवी :एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत राजे धैर्यशील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, सुरगाणा येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला. उद्घाटन प्राचार्य डॉ. सि. जी. दिघावकर यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश चौधरी, रामचंद्र पवार, आकाश मंडलिक, प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते मनोज शेजोळे, मुख्याध्यापक ललित शिंदे, सदू बोरसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उमेद लक्ष्मी महिला बचत गट, कुकुडणे यांनी बेल, बांबू, करवंद लोणची, मध, पापड सादर केले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे महत्व उलगडत सादरीकरण केले.
भोला पवार यांनी रानभाज्यांचे महत्व सादर केले. प्रास्ताविक गौतम लोखंडे सर यांनी केले.कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.