दिंडोरी l वैभव पगार :- मराठा विद्या प्रसारक, समाजाचे ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी या अध्यापक विदयालयात पालक - शिक्षक मेळावा नुकताच सम्पन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय काळोगे होते. प्राचार्य डॉ. संजय काळेगे यांनी डी.एल.एड अभ्यासक्रमांचे थोडक्यात वर्णन केले तसेच वर्षभरातील विविध कार्यक्रम, फी व सरावपाठ ,शिस्त, इतर उपक्रम यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच वर्षभरात येणाऱ्या अडचणी व त्यासंदर्भात पालकांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. तसेच या मेळाव्यात विद्यार्थी शिक्षक पालक संघाची कार्यकारणी निवडण्यात आली. कॉलेज मधील जेष्ठ अध्यापकाचार्य श्री. शिंदे सर यांनी TET तसेच C-TET या परीक्षांची माहिती व महत्त्व यावर सविस्तर माहीती सांगितली .प्रथम वर्षात आलेले अनुभव व शालेय उपक्रम. या विषयीचे मनोगत द्वितीय वर्ष छात्राध्यापिका मृणाल फंड ही ने आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाळ्याला प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी - पालक , शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.श्री. धामणे यांनी प्रास्ताविक केले.