दिंडोरी l मनोज पाटील:- दि.16 रोजी पर्नोड रिकार्ड इंडिया, चाईल्ड सर्वायवल इंडिया, ग्रामपंचायत लोखंडेवाडी व प्रा.आ.केंद्र वरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोखंडेवाडी गावात मोफत (NCD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 60 ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
NCD शिबिरात एकूण 41 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 394 विविध चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये CBC, LFT, RFT, TGT, CA1-25, HBA1C, Serum Calcium, Serum Uric Acid अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या.
या शिबिरामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक जागृतीसाठी समुदाय सी.एच.ओ डॉ. स्नेहल नवले मॅडम यांचे सत्र आयोजित करण्यात आले, तसेच व घोष वाक्य स्पर्धा घेण्यात आली जे पाण्यापासून होणाऱ्या विकारांवर लक्ष केंद्रित करत होती.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील रेड्डी सिस्टर, आशा स्वयंसेविका अनिता वाटाणे मीना कडवे , MPW पालवी, आंगणवाडी सेविका सुरेखाताई व गौरी ताई यांनी उपस्थिती दर्शवली.
शिबिरास फ्लेबोटोमिस्ट राहुल विधाते (वरखेडा प्रा. आ. केंद्र) तसेच CHO स्नेहल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम चाईल्ड सर्वायवल इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. जितेंद्र आहिरे, सहायक प्रकल्प व्यवस्थापक विनोद आडोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ गांगुर्डे, फार्मासिस्ट ऋषिकेश गवडे, आरोग्य शिक्षक तुषार साबळे, सोनाली शेलके, तसेच देविदास निकम यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.