वांगणसुळे l दौलत चौधरी :- सुरगाणा तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांना ऊत आला होता, खुलेआम अवैध गावठी व देशीदारुची विक्री होत होती, तसेच मटका धंदे बिनधास्तपणे सुरु होते, गावतच दारु मिळू लागल्याने ऐन उमेदीच्या काळात तरुणाई व्यसनाच्या व जुगाराच्या आहारी जात होती परिणामी अनेक कुटुंब उध्वस्त होत होती, सामाजिक शांतता धोक्यात आली होती, परंतु नवीन रुजू झालेल्या साहेबांची कामाची चाल चमक त्यांची कामाची बातमी महिलांच्या कानी पडताच महिलांनी त्यांची भेट घेत जनता दरबार भरवण्याची मागणी केली, त्यात अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली, या अगोदर अनेक वेळा मोर्चे काढत निवेदने देत केली, किती मोर्चे काढले, निवेदने दिली, परंतु प्रशासनाचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होते , त्यामुळे दारू बंद होत नव्हती, त्याचप्रमाणे कोठेही न जाता गावातच दारु मिळू लागल्याने गावात व्यसनधिकतेचे प्रमाण वाढले होते, देशीदारु सोबतच गावठीदारू सहज मिळत होती, पोलिसांना चिरीमिरी देऊन ह्या अवैध व्यवसायास ऊत आलेला होता, शिवाय बाऱ्हे सारख्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोलिसांच्या आशिवार्दामुळे दारु, मटका बिनधास्त सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते, त्याची गांभीर बाब लक्ष्यात घेऊन सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मनखेड येथे 27 सप्टेंबर झालेल्या महिलांच्या दारू बंदी विरोधात जनता दरबारात साहेबांनी कडक कार्यवाहीची हमी देत, दारुवाल्याना कडक इशारा दिला, त्यामध्ये पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम, करत मुलाचे लग्न 21 वर्ष तसेच मुलीचे लग्न 18 वर्ष्या खालील होऊ न देण्याची शपत महिलांना व उपस्थिताना दिली.
बाऱ्हे पोलीस स्टेशनला नवीन आलेले अधिकारी श्री गीते साहेब यांनी आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाईने व्यसनाच्या आहारी न जाता चांगल्या मार्गाने पुढे जावे व पोलीस दलात भरती व्हावे यासाठी गेली 25 दिवसापासून पोलीस भरती कॅम्प सुरू केलेला आहे. त्यामुळे नवीन आलेल्या अधिकाराकडे सकारात्मक दृष्टी असल्याची भावना जनसामान्यांमध्ये आहे. म्हणून
तरुणाई व्यसनात गुंतू न देता शिकलेले तरुणांना योग्य मार्गदर्शन, मनखेड, हेमाडपाडा,जाहुले, हस्ते रोंघाने आदी ग्रामपंचायतीनी दारू बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला, परंतु अवैध दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने मनखेड, जाहुले, रोंघाने, हस्ते, या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील जवळपास एक हजार महिला बुधवार दि. 27/08/2025 रोजी सायंकाळी दारूच्या अड्यावर पायी मोर्चा काढून घोषणांनी जांभुळपाडा परिसर दणाणून सोडले. दारुबंदीसाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते साहेब यांना स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे, मागील काळामध्ये पोलिस ठाण्यात कितीही नविन अधिकारी येवून गेले तरी हा प्रश्न कायम होता परंतु नव्याने रुजू झालेले गिते साहेब यांनी महिलांच्या भावना समजून घेत महिलांसोबत जाऊन त्याचं दिवशी धडक कार्यवाही करत सात ते आठ हजाराचा मुद्धेमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. या अगोदरची अख्यायिका अशी असायची की नविन पोलिस अधिकारी आला की त्यांचा खिसा भरण्यांचे काम सुरु राहत असायचे त्यामुळे सर्वसामान्य नुकसान खूप नुकसान होत असुन या प्रकाराकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने असे अवैध व्यवसाय सुरु राहत असे दारु मटका जुगार आदि बेकायदेशीर व्यवसाय सुरु असल्याने आदिवासी ग्रामिन भागातील तरूण भर जवानीत नशेत मग्न होऊन जात आहे या व्यसनामुळे तरुणांमध्ये काम करण्याची ईच्छा होत नसुन त्यामुळे परिसरात देखिल अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून येथील दारुविक्री तसेच मटका व जुगार धंदे थांबविण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, या अगोदर सर्व प्रकाराकडे सोयीस्कर डोळेझाक करीत असल्याने अवैध धंदे जोरात चालू असायचे, धंदे चालविणा-यांना प्रशासनाचे अभय निर्माण झाले आहे असे वाटायचे परंतु झालेल्या कडक कार्यवाहीमुळे योग्य न्याय मिळेल अशी आशा महिलांना आहे, या मोर्च्यात रोंघाने येथील उपसरपंच जयवंती वार्डे, भामा पाडवी, अनु पाडवी, हिरा गंगोडे, यमन वार्डे, यांच्यासह स्वयंम सहाय्यता महिला बचत गटातील हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
*************
प्रतिक्रिया-
१) पहिल्याच दिवशी झालेल्या धडक कार्यवाहीची दखल घेत परिसरात महिलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत , त्यामुळे महिलांमध्ये आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे, अश्याच अधिकाऱ्याची आमच्या बाऱ्हे विभागाला गरज होती, आम्हाला आशा आहे की परिसरात सगळे दारूचे अड्डे ,मटका जुगार बंद होईल.
- जयराम भोये (उपसरपंच मनखेड)
२) बाऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत दारू विक्री, गांज्या, अंमली पदार्थ विक्री किव्हा निर्मिती करताना कोणीही दोषी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल.
- प्रदीप गिते,सहाय्यक पोलीस निरीक्षक बाऱ्हे पोलीस स्टेशन
३) रोंघाने ग्रामपंचायत मध्ये 27 आगस्ट रोजी मनखेड येथे सर्व ग्रामपंचायतीनी दारू बंदीचा ठराव करूनही दारू विक्रेते जुमानत नसल्याने स्वयं सहायता बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत दारू अड्ड्यावर मोर्चा काढत दारू अड्डे उद्धवस्त करून पोलिसांच्या स्वाधीन दारूच्या बॉटल केल्या , याच्या अगोदर आम्हाला कोणत्याच पोलीस अधिकाऱ्यांनी दारू बंद करायला सहकार्य केले नसून आलेल्या नवीन साहेबांकडून आशा आहे की, आम्हाला आलेलं नवीन गिते साहेब नक्की दारू बंद करून आमचा प्रपंच सुखाने चालू देण्यात मदत करतील, अशी आशा आम्हा सगळ्या महिलांना वाटते
-भांमाबाई पाडवी ( महिला जांभुळपाडा)