बोरगाव l लक्ष्मण बागुल :- सुभाष नगर : आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी (वार मंगळवार) सुभाष नगर जिल्हा परिषद शाळेत गावातील कर्मचारी वर्गांच्या पुढाकाराने शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट युनिफॉर्मचे वाटप करण्यात आले. पहिली ते चौथी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एकूण 70 विद्यार्थ्यांना गावातील 53 कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हे युनिफॉर्म देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी गावातील मान्यवरांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश गावित (मुंबई विद्यापीठ) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक श्री. चिंतामण गावित होते. सामाजिक कार्यकर्ते श्री. नवसू गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे पहिले विद्यार्थी श्री. लक्ष्मण चौधरी, इंजिनिअर श्री. परसराम चौधरी, श्री. पांडुरंग गावित, डॉ. गोपाळ गायकवाड, श्री. रमेश चौधरी (मुंबई पोलीस), श्री. वसंत गावित, श्री. तुळशीराम गावित, शालेय समिती सदस्य श्री. निलेश पाडवी व महिला सदस्य श्रीमती उज्वला गावित यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चिंतामण गावित यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक पवार सर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी वर्ग, महिला बचत गट, गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.