दिंडोरी । मनोज पाटील:- संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहु, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी केले. ना. नरहरी झिरवाळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विष्णुपंत पाटील दिंडोरीच्या उपनगराध्यक्षा माधुरी सांळूखे, नगरसेविका शैला उफाडे, कैलास मवाळ आदींच्या प्रमुख उस्थित झाले होते. त्यावेळी ना. झिरवाळ बोलत होते.
ना. नरहरी झिरवाळ यांनी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात येतील,असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ना. झिरवाळ यांनी 6 ते 7 तास कार्यालयात बसून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. यावेळी नागरिकांनी कंार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. स्वागत तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी केले. आभार युवा नेते गोकूळ झिरवाळ यांनी मानले. यावेळी परिक्षित देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त ना. झिरवाळ यांच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी कै. मधुनाना पोपटराव जाधव यांच्या स्मरणार्थ कै. मधुनाना जाधव मित्रमंडळ यांच्याकडून ना. नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.याप्रसंगी बबन जाधव, माधवराव सांळूखे, अविनाश जाधव, अशोक टोंगारे, कृष्णा मातेरे, प्रतीक जाधव, दिपक धुमणे, राहुल कावळे, अभिषेक देशमुख, सचिन गायकवाड, अनिकेत बोरस्ते, भारत खांदवे, जहीर शेख, जलील शेख, अस्करी मिझा, गुलाब गांगोडे, राजेंद्र गांगुर्डे, नरेंद्र पेलमहाले, कैलास देशमुख, प्रितम देशमुख, भाऊसाहेब पाटील, अंबादास पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.