महाराष्ट्र ट्रायबल न्युज

माध्यमिक विद्यालय पिंपळपाडा येथे शिक्षक पालक मेळावा व नवनिर्मित किचन शेड उद्घाटन सोहळा संपन्न.

दिंडोरी l मनोज पाटील:- जनता सेवा मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय पिंपळपाडा येथे आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी मा.मुख्याध्यापक तिवारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला स्वागतगीताने मान्यवारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावच्या सरपंच माननीय सौ फुलाताई चौधरी यांनी भूषविले ,अध्यक्ष व इतर ग्रामपंचायत सदस्य व विविध समित्यांचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुख्याध्यापक श्री तिवारी सर यांनी केले प्रास्ताविकेमधून सरांनी विविध समित्यांचा उद्देश,कार्यें, शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासाबाबत मार्गदर्शन केले.या पालक मेळाव्यात नवीन शासन निर्णय दि. १६ एप्रिल २०२५ अन्वये विलीनीकरण झालेल्या समित्यांची माहिती देण्यात आली व त्यानुसार सद्य स्थितीत आवश्यक असणाऱ्या समितींची स्थापना करण्यात आली.यात 
१) शाळा व्यवस्थापन समिती 
२) सखी सावित्री समिती 
३) महिला तक्रार निवारण समिती 
४) विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या महत्वपूर्ण समित्यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली त्याचबरोबर जुन्या कार्यकारिणीत सदस्यांना गुलाब पुष्प देऊन निरोप देण्यात आला व विद्यालयाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.श्री प्रदीप पांडुरंग जाधव यांची शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या पालक सदस्यांची नेमणूक करण्यात आली तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये श्री गोपीनाथ सिताराम जाधव ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण तज्ञ पदी श्री रामकृष्ण चिमण भोये यांची तसेच प्रत्येक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली सूत्रसंचालन श्रीमती तांबे मॅडम, अनुमोदन श्री ठोके सर,समित्यांचे पदाधिकाऱ्यांची निवड व कार्यकारणी स्थापना श्री जाधव सर व शिंदे सर यांनी केली, शिक्षक मनोगत श्री जाधव सर व श्री शिंदे सर यांनी मांडले आभार श्रीम शिरसाट मॅडम यांनी मानले 
     विशेष बाब म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच सौ फुलाताई चौधरी यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात तयार केलेल्या नवीन किचन शेडचे उद्घाटन करण्यात आले, माता पालकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने