डांग सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक नरेंद्र भुसारे यांना पुणे येथील ए.डी.फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड पुणे येथील ग.दि.मांडगुळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात पुणे आयकर आयुक्त डॉ.नितीन वाघमोडे, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ ॲड.असिम सरोदे,यांच्या शुभहस्ते नरेंद्र भुसारे यांना राष्ट्रीय कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हभप.तुकाराम बाबा महाराज, अनिल जाहीर, वैशाली चव्हाण, राम मांडुरके, श्वेता परदेशी, प्राजक्ता मालुंजकर, ममता भोई होते.यावेळी ए.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरुड, कार्याध्यक्ष महानोर, अजित चौघुले, दिलीप वाघमोडे, शरद माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.घनश्याम चौगुले यांनी केले तर महादेव महानोर यांनी आभार मानले. भुसारे यांना राष्ट्रीय कला शिक्षक पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल डांग सेवा मंडळ नाशिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, संचालक मंडळ,प्राचार्य मधुकर मोरे पवार, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक, मित्र परिवार, पत्रकार बांधव, राजकीय, शिक्षण, सहकार व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.