दिंडोरी। प्रतिनिधी:- येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा पीरषद, पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 29 रोजी दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह, दिंडोरी येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी दिली.
या बैठकीस राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ हे मार्गदर्शन करणार आहे. जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार हे पक्ष कामकाजाचा जिल्हा परिषद गटनिहाय, पंचायत समिती गणनिहाय आढावा घेणार आहे. या बैठकीत संघटनात्मक धोरण, पक्षाची भुमिका, कार्यकर्त्यांची जबाबदारी व निवडणूक लढवण्यासाठीची रणनीती यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस दिंडोरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिंडोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी केले आहे.