महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिंपळपाडा शाळेतील नूतन वर्ग खोली उदघाटन शुभारंभ व २ वर्गखोल्या भूमिपूजन सोहळा संपन्न

दिंडोरी l प्रतिनिधी:- दि.२७/९/२०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा- पिंपळपाडा तालुका -दिंडोरी येथे माननीय नामदार श्री.नरहरी झिरवाळ साहेब (अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या निधीतून शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे उद्घाटन समारंभ व दोन नवीन वर्ग खोल्यांचा भूमिपूजन सोहळा आज दिंडोरी पेठ तालुक्याचे युवा नेते माननीय श्री. गोकुळभाऊ नरहरी झिरवाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
   यावेळी मा. श्री. गोकुळभाऊ झिरवाळ यांचे आगमन होताच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी दिंडोरी पंचायत समितीच्या मा.सभापती श्रीम.लक्ष्मीबाई गावंडे, पिंपळपाडा येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीम. फुलाबाई मुरलीधर चौधरी,उपसरपंच श्री.लक्ष्मण भाऊ जाधव, सौ. हेमलता लक्ष्मण गायकवाड (ग्रामपंचायत सदस्या)सौ. वैशालीताई कपिल गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य) श्री.गोपीनाथ जाधव(ग्रामपंचायत सदस्य),श्री.कांतीलाल भोये (माजी चेअरमन) श्री. ललित गायकवाड (SMC अध्यक्ष), श्री. कपिल गायकवाड (SMC सदस्य)श्री.रामदास जाधव, श्री. विष्णू जाधव,श्री. जनार्दन गायकवाड, श्री.विठ्ठल पाडवी, श्री. निवृत्ती झिरवाळ, श्री. पी. पी. महाले (शि.वि.अधि.), श्री. बी. के. सोनवणे (केंद्रप्रमुख) श्री. रामदास कराटे सर, श्री. पोपट राऊत सर इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
  या सर्व मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची १-१ झाडे भेट देऊन पर्यावरण रक्षणाचा एक संदेश देण्यात आला.तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वड, पिंपळ इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
    श्री. संदिप चौधरी यांनी आपल्या मनोगतातून मा. ना. झिरवाळ साहेब व श्री. गोकुळभाऊ झिरवाळ यांच्या माध्यमातून चार वर्ग खोल्या, सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते,पेव्हर ब्लॉक क्रीडांगणासाठी तार कुंपण, स्मशानभूमी,स्मशानभूमीसाठी बैठक व्यवस्था, पूल,शिवार रस्ते इत्यादी कामे पूर्ण तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगून मारुती मंदिराजवळ प्रशस्त सभामंडप,क्रीडांगण सपाटीकरण, व्यायामशाळा असे कामे मंजूर करणे संदर्भात विनंती केली.
      मा. श्री. गोकुळ भाऊ झिरवाळ यांनी आतापर्यंत मतदार संघात विविध विकासकामे करताना पिंपळपाडा गावासाठी केलेल्या कामांची माहिती सांगून पिंपळपाडा गावाचा असलेला शैक्षणिक वारसा अतिशय चांगल्या प्रकारे असून तो यापुढेही असाच सुरू ठेववा व त्यासाठी अजून संपूर्ण शाळा संकुल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्याबरोबरच माननीय नामदार झिरवाळ साहेब यांचे पिंपळपाडा गावाची असलेले घट्ट नाते यांचे वर्णन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याबरोबरच सभामंडप,व्यायाम शाळा, क्रीडांगण सपाटीकरण इत्यादी कामे लवकरच मंजूर करून ती लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कोतवाल सर व आभार मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने