दिंडोरी - मनोज पाटील:-
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील जेष्ठांना,आई-वडिलांना आदराचे व सन्मानाचे स्थान होते. परंतु आजच्या चौकोनी व व्यस्त कुटुंबात त्यांच्या शारीरिक,मानसिक व भावनिक गरजांकडे दुर्लक्ष होत आहे ही खेदाची बाब असून आपण आई-वडिलांविषयी सतत कृतज्ञता भाव जपला पाहिजे असे प्रतिपादन कवी राजेंद्र उगले यांनी केले.कवी उगले मोहाडी (ता.दिंडोरी) येथील देशमुख परिवाराकडून वडिल कै. जनार्दन बाळासाहेब देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हृदयस्पर्शी संगीतमय कार्यक्रम 'मायबाप' यात कविता सादरीकरण प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमात कवी राजेंद्र उगले यांच्यासह कवी अरुण इंगळे, कवी रवींद्र मालुंजकर यांनीही आई-वडिलांची महती सांगणाऱ्या उद्बोधक कवितांचे गायन करून आई-वडिलांचे प्रति कृतज्ञताभाव जपण्याचे आवाहन केले. नाशिक येथील व्यवसायिक भानुदास पिंगळे यांनीही उत्स्फूर्तपणे आई विषयी कविता गायन केले. कार्यक्रमास गं.भा.विमल देशमुख, भैय्यासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख, मविप्र शिक्षणाधिकारी प्राचार्य डॉ.विलास देशमुख,वनिता देशमुख,दीपक देशमुख,प्रवीण देशमुख,सचिन देशमुख सह मविप्र संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी, शिक्षक,ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्राध्यापक धनंजय देशमुख तर आभार धनंजय वानले यांनी मानले.
.