महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पिकअप पलटी होवून एक भाविक ठार तर अकरा जखमी

वणी l प्रतिनिधी :- सप्तशृंग गडावर ज्योत आणण्यासाठी जाणारी पिकअप गणेशघाटात वळणावर पलटी झाल्याने एक भाविक ठार तर अकरा जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. मालेगाव तालुक्यातील बिलकोट, झोडगे , शेजवाळ, गुगलवाड येथील भगवती भक्त आपआपल्या गावातील नवरात्र उत्सवासाठी ज्योत घेण्यासाठी रविवार दि.२१ रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान पिकअप मध्ये जात असतांना घाटातील वळणावर पिकअप पलटी झाल्याने यातील १२ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून आणले. यापैकी उमेश धर्मा सोनवणे ( वय १७ ) हा मयत झाला तर मोहन भाईदास मोरे, रवींद्र नाना सोनवणे, प्रवीण हिरामण सोनवणे, दादाभाऊ गोरख कुवर, अशोक नाना सोनवणे, साईनाथ सुखदेव सोनवणे, बबलू गुणाजी सोनवणे, बादल संजीव सोनवणे, किरण एकनाथ सोनवणे, सुनील श्रावण सोनवणे (सर्व रा. भिलकोट, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात डॉ शुभम सातवे यांनी प्रथमोपचार केले तर यातील काही जखमींना नांदुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे बिलकोट व परीसरातील गावावर शोककळा पसरली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने