त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत मुलवड येथील बेझ आणि सावरपाडा या गावांमध्ये येण्या-जाण्यासाठी वापरण्यात येणारा मुख्य रस्त्या सध्या खराब व तुटलेल्या अवस्थेत असुन या रस्त्यावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग नाशिककडे असुन प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होतं आहे. या भागाचे आमदार स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही याबाबत ग्रामस्थांत नाराजी आहे.या तिन्ही गावांची मुख्य बाजारपेठ हरसुल आहे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मुलवड येथे असुन रुग्ण गरोदर महिला यांना दवाखान्यात वेळेत पोहोचवणे कठीण जाते.
आंदोलनाचा इशारा:- या पार्श्वभूमीवर आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष मा.श्री.लहुदास भाऊ बरफ काकडपाणा,यांच्यासह दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने रस्ता नव्याने तयार करावा अशी मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.