दिंडोरी । मनोज पाटील:- पद्श्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड जन्मभूमी स्मारक उद्घाटन शनिवार दि. 13 रोजी सायंकाळी 4 वाजता आंबेदिंडोरी येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, खा. नीलेश लंके, खा. राजाभाऊ वाजे, आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, माजी आमदार सुनील भुसारा, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दत्तात्रय पाटील, जे. पी. गावित, धनराज महाले, रामदास चारोस्कर, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, गोकूळ पिंगळे, जयंत दिंडे, सुनीता चारोस्कर, शहाजी सोमवंशी, विद्याताई पाटील, प्रवीण जाधव, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे, युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड आदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.