बाऱ्हे l नामदेव पाडवी :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गट तट बाजुला ठेवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकञ यावे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडुन आणुन संपूर्ण तालुका राष्ट्रवादीमय करावा असे आवाहन आमदार नितीनभाऊ अर्जुन (एटी) पवार यांनी ठाणगाव गटातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितले.
सुरगाणा तालुका हा शासनाने आकांक्षित तालुका म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे अजुनही तालुक्यात काही ठिकाणी पाणी, शिक्षण, आरोग्य, बंधारे, राष्ट्रीयकृत बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दळणवळण ह्या सोयी सुविधा नसल्यामुळे बाहेर कामासाठी स्थलांतर होत आहेत. हे थांबविण्यासाठी आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र राहून कामाला लागायचे आहे कारण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांनासुद्धा भरपूर निधी असतो आणि त्यातून विकास कामे केली जातात. मी सर्वांना एकच सांगतो कि, व्यसनांपासून तरूणांनी दूर रहावे असे आवाहन विद्यमान आमदार नितीनभाऊ अर्जुन (एटी) पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजु पवार, उपजिल्हा अध्यक्ष नवसु गायकवाड, युवराज लोखंडे, माधव पवार, रामदास केंगा, काशिनाथ चौधरी, हुशार देशमुख, काशिनाथ वाघमारे, मनोज देशमुख, पुंडलिक खंबाईत, नामदेव पाडवी, गोरख महाले, नारायण महाले, जयराम महाले, मनोहर महाले, दिपक महाले, चिंतामण वार्डे, रामदास जाधव, सुरेश वार्डे, सुरेश महाले, प्रकाश धुम, सुर्यकांत जाधव, मनोहर खंबाईत, संरपच तुळशीराम महाले, चंद्रकांत भोये, पुंडलिक बागुल, आनंदा झिरवाळ, मोहनदास भोये यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जि.प. सदस्य गोपाळराव धुम यांनी केले.