महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वादळी पावसामुळे शेतीपिके व सोलर पॅनलचे मोठे नुकसान

बोरगाव l प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतीपिकांसह सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सहा मंडळांत मिळून तब्बल १००.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
परतीच्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, अनेक ठिकाणी स्टाबेरी, टोमॅटो, घेवडा, भात, वरई, नागली तसेच भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळामुळे गावोगावी झाडे कोसळली असून, विजेच्या ताराही तुटल्या आहेत. यामुळे परिसरात जवळपास वीस तासा पासून वीज नाही आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी मुरलीधर ठाकरे, रघुनाथ भोये, यशवंत भोये, नवसू खांडवी, अशोक भोये, रमेश महाले, वसंत हाडस, मोतीराम गावित आदींनी केली आहे. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
--
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे डीपीवर झाडं पडल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले होते.
--

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने