बोरगाव l प्रतिनिधी :- नाशिक सातपूर येथील कंपनी परिसरात सिक्युरिटी कर्मचारी महेंद्र सोना व हाउसकीपिंग कर्मचारी यांच्या सानिध्याने मांज्यात अडकलेल्या एका पक्ष्याला सुखरूप वाचविण्यात आले.
कंपनी परिसरात उडत असताना हा पक्षी मांज्यात अडकला होता. कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्परतेने बचावकार्य केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर पक्षाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशील आणि जीवदायी कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.