दिडोरी l वैभव पगार: सेवकांच्या पतसंस्थेचा आर्थिक कारभार ऑनलाईन करण्यात येत असून आगामी काळात सेवकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी अधिक ठोस पावले उचलली जातील.असे प्रतिपादन चेअरमन जे.के.जाधव यांनी केले.
नाशिक जिल्हा बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दिंडोरी येथील संस्कृती लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्ष चेअरमन जे .के जाधव बोलत होते .
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिप प्रजल्वन व सरस्वती माता प्रतिमा पुजन करण्यात आले.सभेच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संचालक बी बी अलई यांनी मागील वर्षभरातील कार्याचा सविस्तर आढावा घेणारा वार्षिक अहवाल सादर केला. अहवालात संघटनेच्या आर्थिक परिस्थितीचा, उपक्रमांचा, सभासदांच्या कल्याणार्थ राबविण्यात आलेल्या योजनांचा तसेच भविष्यातील नियोजनाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला.
तसेच जाधव यांनी सर्व सभासदांनी संघटनेच्या बळकटीसाठी एकत्र राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थित सदस्यांनी विविध विषयांवर चर्चा करत सूचना व प्रश्न मांडले. काही महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात यावेळी व्हाय चेअरमन पी पी वाडीकर संचालक के आर व्यापारे एम ए निकम ए बी अहिरे बि के आगवण पि आर मोरे डी एस टरले आर बी ढिकले तसेच यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार संचालक बी एल गायकवाड यांनी केले.
राष्ट्रगीता ने सभेची सांगता करण्यात आली.