महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पांगरणे कार्यक्षेत्रात ४७९८ जनावरांना लंपी चर्मरोग लसीकरण

प्रतिनिधी बोरगाव:- सुरगाणा तालुक्यातील पांगरणे कार्यक्षेत्रात लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी एकूण ४७९८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. कार्यक्षेत्रात रोग आढळल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपचार, लसीकरण, जनजागृती सभा तसेच डेअरी सभांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करून आजार आटोक्यात आणला.
      या मोहिमेत डॉ. शिंदे, डॉ. पाडवी, डॉ. अंनतवार, डॉ. खान, डॉ. गावित यांच्यासह दीपक महाले, अजित महाले, तुकाराम पवार, संतू ठाकरे, दीपक गावित तसेच खाजगी पदवीधारक, पशुधन पर्यवेक्षक, सपविअ, व्रणोपचारक व परिचर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल डॉ. नरेंद्र भागवत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग पं.स. सुरगाणा यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने