त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- दि. १० सप्टेंबर २०२५ वार बुधवार रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा *शिरसगाव* ता. त्र्यंबकेश्वर जि. नासिक येथे *विर बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती व जनजाती गौरव दिनाच्या* निमित्ताने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे (भा.प.से), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नासिक यांच्या मार्गदर्शनाखाली *रानभाज्या, कडधान्य महोत्सव व हस्तकला प्रदर्शन* आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन *आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत* यांनी करुन अध्यक्ष, दिपा ब्रम्हेच्या, (नासिक शहर,) सदस्य महेश संत, सदस्य कल्पना महाले, जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र राज्य, व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन रानभाज्या, कडधान्य महोत्सव व आनंद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
या महोत्सवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शिरसगाव, ठाणापाडा,मुंरबी, बोरीपाडा, देवडोगरा, खरशेत,बेरवळ, ओझखेड, मुलवड तसेच शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह त्र्यंबकेश्वर येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक,गृहपाल, अधिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी विविध प्रकाराच्या रानभाज्या बनवून रानभाज्या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या महोत्सवात विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांच्या कडुन वेगवेगळ्या प्रकारचे रानभाज्याचे व कडधान्याचे स्टॉल लावण्यात आले होते.
या महोत्सवात अंबाडी,तेरा, वास्ता,माटाची भाजी, पेढराची भाजी,
खुरसणीची भाजी,तांदुळाची
भाजी,जिरा भाजी, कवदर भाजी, मोहठ्याची भाजी, तेराची पातवड, लोतीची भाजी, आक्राची भाजी,
भोकोरले, आंळिब,कुळीदाचे बेसन, उदिडदाळीचे पदार्थ, नागली, तांदूळ,व बाजरीची भाकरी, तसेच या भागातील विविध प्रकारांच्या रानभाज्या आणि खाद्य पदार्थ बनवून विद्यार्थी, पालक,शिक्षक व उपस्थित मान्यवर यांनी या पदार्थांची चव घेऊन आनंद लुटला.
या रानभाज्या व कडधान्य महोत्सवा प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भांगरे, मुख्याध्यापक शितल खंडे, सुरेंद्र शेंडें, आण्णा राठोड , गृहपाल शैलेंद्र तारडे, सायली बाचल, प्रशांत चामाटे, अधिक्षिका विद्या पाहुणे अधिक्षक प्रभाकर शिंदे, विष्णु हिंगळे, शिक्षक दशरथ वडाल, अरुणा भाले, मनिषा गणवीर, विठ्ठल वाघेरे, विजय लोहार, विजय लहारे, विष्णु चोधरी, संतोष वाघमोडे व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रानभाज्या व कडधान्य महोत्सवाचे नियोजन व आयोजन आश्रमशाळा शिरसगाव येथील मुख्याध्यापक दिपक भास्कर अधिक्षिका पुणम बावणे,
अधिक्षक अरुण बागले, माध्यमिक शिक्षिका सिता भोये,माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले, अमोल कामडी, प.प्रा शिक्षक संदिप रुपणर, प्राथमिक शिक्षक अमोल कोपरेकर , मधुकर लहारे , शोभा जाधव, मनोहर लहारे, पवन महाले, कनिष्ठ लिपिक किरण राऊत, शिक्षकेत्तर कर्मचारी किसन टबाले, अनुसया गायकवाड,आरती वाघमारे, हेमराज धुम, हेमंत महाले, लिला महाले, कमल कोंगील राहुल वारडे व विद्यार्थी यांनी केले.