दिंडोरी l मनोज पाटील :- उद्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या 49 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, दिनांक 09 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन मा.श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
बॉयलर अग्निप्रदीपनाचा शुभारंभ मा.सौ. व श्री.देविदास लहानु पवार (पिंपरखेड), मा.सौ. व श्री.रमेश धोंडीराम दिघे (परमोरी), मा.सौ. व श्री.शशिकांत नामदेव गामणे (उमराळे बु.), मा.सौ. व श्री.निवृत्ती हिरामण चौधरी (वनी खुर्द), व मा.सौ. व श्री.शरद लक्ष्मण माळी (शिवरे) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या प्रसंगी सर्व सभासद, शेतकरी बांधव, ऊस उत्पादकांनी या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक मा. विजय खालकर यांनी केले आहे.