महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरीत महिला सप्ताहाची सांगता

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी शहरातील कोंगाई माता नवरात्रोत्सव महिला अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात पार पडला.
    नवरात्रोत्सवानिमित्त सर्व दिंडोरीकरांना अध्यात्माची चांगली मेजवाणी मिळाली. महिला किर्तनकरांच्या विविध किर्तनामुळे दिंडोरीकर मंत्रमुग्ध झाली. त्याचबरोबर दांडियात रमण्यापेक्षा अनेक कुटूंबांनी संस्कारांवर भर दिला व अखंड हरिनाम सप्ताहात भाग घेतला. यातून युवा पिढी व बालकांवर चांगले संस्कार करणारे प्रबोधन झाले. सप्ताहाचे सर्व दिवस महिलांनीच किर्तन केली. टाळकरी, विनेकरी म्हणून महिलाच पुढे आल्या. विद्यमान मंत्री ना. नरहरी झिरवाळ व खासदार भास्कर भगरे यांची पुर्णवेळ हजेरी चर्चेचा विषय ठरली. दोघांनीही महिला सप्ताहास शुभेच्छा दिल्या. सप्ताह काळात कलश पूजन, ग्रंथ पूजन, विना पूजन, मुदृंग पूजन, टाळ पूजन यांच्यासह काकडा भजन, श्री निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण, हरीपाठ व देवीची आरती, हरिकिर्तन, भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात रजनी जाधव (मोहाडी), अनिता जाधव (संगमनेर), राजराजेश्‍वरी भागवत (माळेदुमाला), आरती मगर (मुंबई), अंजली केंद्रे (लातूर), अंजली शिंदे (निफाड), सांध्वी तुलसीदिदी, सुनिता जाधव (दिंडोरी) आदींची किर्तने झाली. आरती शिंदे (श्रीरामपूर) यांचे काल्याचे किर्तन झाले आहे. संयोजन ह.भ.प. सुनीता ढगे जाधव यांनी केले. कोंगाई माता महिला भजनी मंडळांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने