बाऱ्हे l नामदेव पाडवी :- माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहूचीबारी येथे मुख्याध्यापक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
या उपक्रमात माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेच्या विकासासाठी मदत करण्याचा निर्धार केला. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि शाळेच्या प्रगतीसाठी सहभागाचा संकल्प करण्यात आला. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन मदतीचा हात देण्याचा निर्धार करण्यात आला. नव्याने रूजू झालेले उपक्रमशील शिक्षक हरिश्चंद्र देशमुख यांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक कमलाकर जाधव, माजी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ मोरे, शिक्षक धर्मराज मोरे, दुर्वास पाडवी, नाशिक पोलीस नामदेव भोये, उपसरपंच नामदेव पाडवी, सदस्य शांताराम मोहरे, यादव गवळी, यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक भास्कर नाठे यांनी केले.