निळवंडी । प्रतिनिधी:- दिवाळी सणासाठी विविध आकाश कंदील बाजारपेठेत दाखल झाल्या असून या आकाश कंदीलांनी बाजारपेठा सजल्या आहे. या आकाश कंदीलांनी ग्राहकांचे लक्ष वेधुन घेतले आहे.
यंदाच्या दिवाळीच्या सत्रात आकाशकंदील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आल्याने यंदा आकाश कंदील मात्र किंमतीच्या भावात मोठ्या प्रमाणावर भाव खात आहे. त्यामुळे ग्राहक वर्गामध्ये थोडी नाराजी निर्माण झाली आहे. तरीही आला दिवाळीचा सण स्वागत करून आनंदाने यासाठी आकाशकंदील खरेदी करून परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दिवाळीमध्ये दिव्यांना महत्त्वाचे स्थान माणण्यात येत असते. त्यासाठी दिवे, पणत्या, लायटिंग, घर सजावटीसाठी फुलमाळा, फटाके, नवीन कपडे व आकर्षक आकाशकंदील खरेदी करण्यासाठी ग्राहक वर्गाची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात पैठणी, हँण्डवर्क, चटाई, हँण्डमेड, पेपर पासून बनविण्यात आलेले आकाश कंदील, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या शिवमय कंदीलासह महादेवाच्या विविध देखाव्यांचे कंदील विक्रीसाठी दाखल झाले असून ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत आहे.