माळेगांव l धर्मराज चौधरी:- पेठ तालुक्यातील शेनवडपाडा गांव हे डोंगर दर्या मध्ये वसलेले असून अतिदुर्गम भाग असुन येथील अनेक कुटूंब उदर निर्वाह साठी जिल्हाच्या ठिकाणी स्थलांतर होतात त्यामुळे आपलं किचन फाऊडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेनवडपाडा या गावामध्ये बाल गोपाल आणि महिलां वर्ग यांना कपडे बिस्कीट वाटप पुल ना फुल पाकळी म्हणून वाटप करून दिपावली साजरी केली प्रथमता आपलं किचन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे गेल्या 2021 ते 2025 पासुन ग्रामीण भागा मध्ये विविध कार्यक्रम राबवित असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेश विद्यार्थ्यांना पाटी पुस्तक दप्तर शालेय सुविधा देण्याकरिता आपलं किचन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे अति दुर्गम भागा मध्ये काम करत असते तसेच पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंध्रूटे अंतर्गत शेणवडपाडा हे गांव साधारण दीडशे लोकसंख्या असलेले डोंगर दर्या मध्ये वसलेले असुन येथे हे गांव अनेक मुलभुत सुविधा पासुन वंचित असल्याने . या गांवा मध्ये गेल्या दोन वर्षापासून आपल किचन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे दिपावली निमित्त संपूर्ण गावामध्ये महिला पुरुष मुले यांना कपडे खाऊ देऊन दिपावली साजरी केली जाते या हीवर्षी दिपावली साजरी करण्यात आली परंतु गावकर्यांनि आमचा हनुमंत राया उघड्यावरती असून येथे हनुमान मंदिराचे बांधकाम व सभामंडप बांधून द्यावा या संदर्भात गावकऱ्यांनी मागणी केली व आमच्या गावातील मुले हे बाहेर गावांमध्ये शिक्षणासाठी 2 ते 3 किलोमीटर पायी प्रवास करत असतात तर त्यांच्यासाठी सायकली उपलब्ध करून द्यावी अशा समस्या गावकऱ्यांनी मांडल्या या समस्या आपल किचन महाराष्ट्र राज्य फाउंडेशन मार्फत लवकरात लवकर सोडवण्यात येथील असे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले यावेळी उपस्थित आपले किचन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अभिजीत परदेशी चेतन सोनवणे अथर्व राणे प्रशांत बिरारी वैभव टोंगळे विकास पाटील एस शिंदे राहुल पाटील सोपान पवार धर्मराज चौधरी गणेश सातपुते विनायक फसाळे कैलास गारे ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित मोठ्या संख्येन होते
आपलं किचन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत शेनवडपाडा गावामध्ये कपडे वाटप करून दिपावली साजरी
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0