महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जिल्हा परिषदेचे चारही गट आरक्षित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड कळवण पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण जाहीर...

कळवण l प्रतिनिधी- कळवण तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चारही गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.तर पंचायत समितीचे सहा गण अनुसूचित जमातीसाठी राखीव असून निवाणे व मानुर गण सर्वसाधारण झाला आहे. मानुर गण सर्वसाधारण स्त्री राखीव आहे.
      कळवण पंचायत समितीच्या आठ गणांचे आरक्षण मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कोल्हापूर फाटा येथील पंचायत समितीच्या सभागृहात जाहीर करण्यात आले.सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश,तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या उपस्थितीत गण आरक्षण सोडत काढण्यात आली.तालुक्यातील अंबिका ओझर येथील धनश्री भगवान खिल्लारी या चिमुकलीने चिठ्ठी काढल्यानंतर तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. पंचायत समितीच्या आठ गणांपैकी सहा गण हे अनुसूचित जमाती साठी राखीव असून केवळ मानुर आणि निवाणे ह्या दोन जागा सर्वसाधारण असणार आहेत. मानुर गण सर्वसाधारण स्त्री साठी राखीव असणार आहे.पंचायत समितीतील चार गण स्त्रियांसाठी राखीव झाले आहेत.

पंचायत समितीचे आरक्षण - 
गण -प्रवर्ग
कनाशी - अनुसूचित जमाती महिला
ओतूर - अनुसूचित जमाती
अभोणा -अनुसूचित जमाती महिला
पुनदनगर -अनुसूचित जमाती
मोकभनगी - अनुसूचित जमाती महिला
दळवट -अनुसूचित जमाती
मानुर - सर्वसाधारण महिला
निवाणे - सर्वसाधारण 

जिल्हा परिषद आरक्षण
गट प्रवर्ग 

मानुर- अनुसूचित जमाती महिला 
अभोणा-अनुसूचित जमाती महिला 
कनाशी-अनुसूचित जमाती महिला 
पुनदनगर-अनुसूचित जमाती महिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने