महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यात पंचायत समितीच्या आठ गणातील आरक्षण सोडत जाहीर

बाऱ्हे /अलंगुण l प्रतिनिधी :- तालुक्यात पंचायत समितीच्या आठ गणातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमाती स्री राखीव मध्ये गण क्र. ४५ चिंचले,गण क्र.४७ खोबळा, गण क्र. ४९ पळसन, गण क्र. ५२ शिंदे (दि) महिला राखीव आरक्षण निघाले तर अनुसूचित जमाती करीता 
 गण क्र. ४६ उंबरठाण, गण क्र. ४८ श्रीभुवन, गण क्र. ५० ठाणगाव, गण क्र. ५१ हतगड हे अनुसूचित जमाती करीता राखीव झाले आहेत. तहसिल कार्यालयात जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं. १ या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थीनी श्रृती डोंगरदिवे, प्रणिता थविल यांच्या हस्ते
आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे, तहसिलदार रामजी राठोड, नायब तहसिलदार मोहन कुलकर्णी, दिनेश पाडेकर, सुयोग वाघमारे,नानासाहेब बनसोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल बागुल सह सामाजिक तसेच विविध राजकीय पक्षातील भिका राठोड, राजेंद्र पवार, नवसू गायकवाड, परशराम गावित, पांडुरंग वाघमारे, आनंदा झिरवाळ, मनोज देशमुख, पुंडलिक घांगळे, प्रकाश धुम, धर्मराज पाडवी, हरी भोये, प्रकाश खंबाईत, काशिनाथ वाघमारे, काशिनाथ गावित, दिनेश चौधरी, रामदास केंगा, दिलिप राठोड, सुरेश पिठे, भास्कर धुम, विठ्ठल गावित  
सह विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुरगाणा तहसिल कार्यालयात आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढतांना निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे, तहसिलदार रामजी राठोड सह शालेय विद्यार्थींनी..

सुरगाणा तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणातील आरक्षण सोडत जाहीर 

 स्त्री राखीव (अनुसूचित जमाती)

१) शिदे दिगर
२) पळसन
३) चिचले
४) खोबळा

पुरुष राखीव (अनुसूचित जमाती)

१) उबरठाण
२) हदगड
३) स्रीभुवन
४) ठाणगाव

सुरगाणा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटाचे आरक्षण

ठाणगाव – अनु जमाती स्त्री
उंबरठाण – अनु जमाती स्त्री
त्रिभुवन –ST
हतगड –ST

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने