दिंडोरी l प्रतिनिधी :- मुळाने येथे होत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे तसेच विद्यार्थ्यांना वैचारिक प्रबोधन देखील दर दिवशी विविध मार्गदर्शकांनमार्फत होत आहे. त्यात शाश्वत, सामाजिक आणि कृषी विकास, वनीकरण आणि कुरण विकास, दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत आहे. सर्व स्वयंसेवक अगदी उत्साहाने गावात श्रमदान करतात. मृदा आणि जलसंधारण या संदर्भात मार्गदर्शन करताना प्रा. पवन जाधव म्हणाले की, मृदासंधारण करण्यासाठी समतल शेती,बांध-बंदिस्ती,वृक्षारोपण,पिकांची फेरपालट करणे गरजेचे ठरते. पावसाचे पाणी साठवणे व योग्य प्रकारे शेततळे,पाझर तलाव,चेक डॅम,पावसाचे पाणी साठवण याद्वारे जलसंधारण करता येणे शक्य आहे. यात रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. सचिन लोखंडे, प्रा. प्रविण महाले, रा. से. यो. स्तर+२ सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा. पवन जाधव, प्रा. योगेश मोहन यांच्या उपस्थितीत शिबिर होत आहे.
मृदा व जलसंधारण हाच शाश्वत शेतीचा पाया
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0