महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वलखेड येथे केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न

वलखेड l प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रिडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा वलखेड जि.प.प्राथमिक शाळेतील प्रशस्त आवारात मोठ्या आनंदमयी व उत्साहात पार पडल्या.
     येथे होणारे या स्पर्धेची सुरुवात वलखेड गावचे सरपंच हिरामण पाटील व मा.सरपंच विनायक शिंदे तसेच केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम. अनुसया पाटील यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आल्या सदरील स्पर्धेत वलखेड जि.प.प्राथमिक शाळेने समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक ,वैयक्तिक नृत्य प्रथम क्रमांक, स्पेलिंग बी स्पर्धेत इ.1,2,3,व 4 थी प्रथम क्रमांक , वक्तृत्व स्पर्धेत लहान गट प्रथम क्रमांक तसेच इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवून बक्षिसांची बाजी मारली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे गोरख पाटील, नारायण राजगुरु,नितीन शिंदे, रामदास चारोस्कर, माणिक शिंदे, ग्रामसेवक चव्हाण, काशिनाथ गायकवाड, व गावातील इतर नागरिक तसेच केंद्रातील 14 शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते.तसेच शाळेतील मुख्याध्यापक श्री.रामदास गायकवाड ,शिक्षिका श्रीम. कुमुदिनी पवार, श्रीम. गिताबाई बहिरम, श्रीम. कौशल्या गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने