दिंडोरी l प्रतिनिधी :- गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने पेठ कडून येणाऱ्या ईरटीका कारला समोरून धडक दिल्याने ईरटीका कारचे अक्षरशा समोरून चिंधड्या उडाल्या होत्या त्यामुळे कार मधील तीन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहे.तसेच स्कार्पिओ वाहनातील एक जण ठार झाला असून जखमींना टोल नाक्यावरील रुग्णवाहिका चालक मयूर केग यांनी तात्काळ ग्रामीण नाशिक रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिव दमनच्या सिलवसा शहरातील ईरटीका क्रमांक DD. 01 Aa. 9013 ही गाडी पेठ रोडने नाशिक येथे जात असताना नाशिक कडून येणारी स्कार्पिओ क्रमांक GJ. 15.CR .7964 हिने चाचडगाव टोल नाक्याजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोर धडक दिल्याने ईरटीका मधील तीन जण जागीच ठार झाले असून त्यामध्ये शाहरुख खान फराकत खान (वय) 28 राहणार सिल्वासा (बाकी दोघांचे नावे कळू शकले नाही.) तर स्कार्पिओ मधील चोगिलाल हिरालाल गुजर वय 75 राहणार देवगड जिल्हा राजस्थान हे जागीच ठार झाले आहे असून जखमीं असलेले किसनलाल हिरालाल गुजर वय (45 )गणेशा किसनलाल गुजर वय (42 )खुशी किसनलाल गुजर वय (१२ )पुनम गुजर वय( 20) वर्षे हे सर्व राहणारे जिल्हा राजगड राजस्थान यांना नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ही माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळताच दिंडोरी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस नाईक संजय गायकवाड, पीएसआय खुळे,पोलीस हवालदार पानसरे,पी.सी जोपळे,महामार्ग पोलीस पी एस,आय दीपक दोडे,सहायक पोलीस निरीक्षक मीरा अदमान, पोलीस हवालदार बोडके, पोलीस नाईक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल शेख ढगे,मसदे यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य करून रस्त्यावरील ट्राफिक व्यवस्थित केली. पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे .
[नाशिक पेठ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच वाहन चालवायला लागते चाचडगाव पासून पुढे अपघात कायम होत असतात याकडे राष्ट्रीय महामार्गवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची रुंदी व डिव्हायडर लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक करत आहे नाहीतर असेच अपघात होत राहणार याची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा चाचडगाव परिसरातील नागरिकांनी दिला आहे]