महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ननाशी परिसरातील पोलीस पाटलांकडून वन परीक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांचा सत्कार.

ननाशी l प्रतिनिधी:-ननाशी वन परीक्षेत्रात नव्याने रुजू झालेल्या वन परीक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांचा ननाशी परिसरातील पोलीस पाटलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
     ननाशी परिसर हा वनसंपत्ती व वन्यजीवांच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने, वनसंवर्धन व वनअपराध प्रतिबंधासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारलेल्या अधिकारी सीमा मुसळे यांचे पोलीस पाटलांनी स्वागत करून सहकार्याची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सीमा मुसळे यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस पाटिलांनी वनविभागाच्या कार्यास आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
सत्काराला उत्तर देताना सीमा मुसळे यांनी, “वनसंवर्धनाचे कार्य प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस पाटील व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. सर्वांच्या समन्वयातून ननाशी परिसरातील वनसंपत्तीचे संरक्षण केले जाईल,” असे सांगितले.
या कार्यक्रमास पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा सचिव शंकरराव तुंगार, ननाशी परिसरातील पोलीस पाटील विश्वनाथ चौधरी,निवृत्ती गवळी,हनुमंत माळगावे,भास्कर हिंडे,कमलाकर चौधरी,मोहन गवळी,लहुदास गांगोडे,यांच्यासह वनविभागाचे आमलूक,गवळी,गावंडे,गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने