महाराष्ट्र ट्रायबल न्युज

चिराई घाटात पळसन–नाशिक बस फेल; सुमारे ४० प्रवासी अडकले – ग्रामीण बससेवेची दयनीय अवस्था

बोरगाव l प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात पळसन–नाशिक ही एसटी बस अचानक रस्त्यातच नादुरुस्त झाल्याने सुमारे ४० प्रवाशांचे मोठे हाल झाले. डोंगराळ व दुर्गम भाग असलेल्या चिराई घाटात बस फेल झाल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ अडकून पडावे लागले. वृद्ध, महिला व विद्यार्थी यांना विशेष त्रास सहन करावा लागला.
    ग्रामीण भागात धावणाऱ्या बहुतांश बस या अत्यंत नादुरुस्त अवस्थेत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. बस रस्त्यातच बंद पडणे, वारंवार बिघाड होणे हे सुरगाणा तालुक्यात नित्याचेच झाले आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसे वाया जात असून जीवितासही धोका निर्माण होत आहे.
     तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी एसटी हीच मुख्य वाहतूक व्यवस्था आहे. मात्र देखभाल-दुरुस्तीअभावी या बस सेवा विश्वासार्ह राहिलेल्या नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन जुन्या व नादुरुस्त बसेस त्वरित बदलाव्यात तसेच सुरक्षित व नियमित बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने