महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*ग्रामीण भागातील बस सेवेकडे पिंपळगाव आगाराचे दुर्लक्ष*

चिंचखेड l प्रतिनिधी:- प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक एसटी बस प्रवाशांना योग्यरित्या सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचे चित्र दिवसेंदिवस बघायला मिळते आहे.
   पिंपळगाव बसवंत आगारातील अनेक बसेस नादुरुस्त आहेत. स्टेरिंग मध्ये बिघाड होणे, गिअर अडकणे रेडिएटर फुटणे, इंजिन ओवर हीट होणे, धक्का मारण्याची वेळ येणे, ऑइल पंप फुटणे, असे प्रकार पिंपळगाव आगारातील बसचे बघावयास मिळतात. तर अंतर्गत भागातही बसचे सीट तुटलेले असल्याचे दिसून येते, सिटांच्या गाद्या फाटलेल्या, खिडक्या फुटलेल्या अवस्थेत तर पत्रा तुटलेला असणे तसेच बसचा आवाजही प्रवाशाच्या कानाला सहन होणार नाही इतका असणे अशा समस्या जुन्या बसमध्ये बघायला मिळत आहे.
 नऊ जानेवारी रोजी पिंपळगाव बसवंत आगारातील बस चिंचखेड वरून शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन जात असताना त्या बसचा ऑइल पंप तुटला. सुदैवाने कुठलेही दुर्घटना घडली नाही. परंतु विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना या नादुरुस्त बसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
   आगारातून निघणाऱ्या बस सुस्थितीत आहेत का याची शहानिशा होण्याची गरज असून नादुरुस्त बसमुळे प्रवाशांसह चालक आणि वाहकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.. संबंधित प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यप्रमाने एसटीने प्रवाशांना चांगली सेवा देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिंडोरी राष्ट्रवादीचे उपतालुकाप्रमुख विष्णूपंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने