महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ढकांबे विद्यालय बालिका दिवस उत्साहात साजरा.

दिंडोरी l प्रतिनिधी:- क्रांतीवर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे येथे 3 जानेवारी 2026 रोजी स्त्रि शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ' बालिका दिवस' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण केले गेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका लता काकड यांनी स्वीकारले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीनी केले यावेळी विद्यार्थिनींनी प्रभावीपणे आपले विचार मांडले. 
शाळेचे मुख्याध्यापक अनिल ताडगे यांनी सावित्रीबाईंनी जे कष्ट सोसले यावर प्रकाश टाकला .अध्यक्ष भाषणात लता काकड मॅडम यांनी मार्गदर्शन केले. 
    या कार्यक्रमाचे नियोजन उगले आर टी, सांगळे एस पी, गायकवाड मॅडम, अशोक गीते यांनी केले व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने