महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बरफ कुळ परिवाराचे १२वे वार्षिक स्नेहसंमेलन जव्हार येथे उत्साहात संपन्न

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:-महाराष्ट्र, गुजरात व दादरा नगर हवेली येथील बरफ कुळ परिवाराच्या वतीने आयोजित १२वे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ हे दि. ०१ फेब्रुवारी २०२६, रविवार रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक तारपा व सांबळ वाद्यांच्या गजरात मंडपाच्या प्रवेशद्वारावर आरती करून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. सकाळी १०.०० वाजता बरफ कुळाचे कुलदैवत ‘हिरवा हिमाय’ वाजत-गाजत संमेलन मंडपात आणण्यात आले. पारंपरिक पद्धतीने कुलदैवताची पूजा करून सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंडपात मांडण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेश बरफ (डहाणू) यांनी मांडले. तर सूत्रसंचालन प्रकाश बरफ (कोगदे, जव्हार) व लहुदास बरफ (काकडपाणा, त्र्यंबकेश्वर) यांनी केले.

प्रमुख पाहुणे
बरफ कुळ स्नेहसंमेलन संस्थापक अध्यक्ष व कुटुंब प्रमुख बाबूभाई बरफ (सेलवास),
छित्रूभाई बरफ (गुजरात),
चंदुभाई बरफ (खानवेल),
वामन बरफ (पनवेल),
जयराम बरफ (गायगोठा),
युवराज बरफ (नवी मुंबई),
देवलुभाई बरफ (गुजरात)
विशेष अतिथी
आमदार हरिश्चंद्र भोये,
सरपंच सौ. मथुरा बसरा,
माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात व दादरा नगर हवेली येथून आलेल्या बंधु-भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
      यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून कुटुंबातील ऐक्य, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यावर भर देत, कोणतीही समस्या उद्भवल्यास परिवार एकजुटीने मार्गदर्शन व मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. कुटुंबातील अडचणींवर सहपरिवार उभे राहून मात करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
संमेलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधु-भगिनींनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेण्यात आला. कुटुंबाची ओळख, परंपरा व एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याबाबत सखोल चर्चा झाली.
      संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी संमेलन व्यवस्थापन, संस्थापक व आयोजक समितीचे योगदान मोलाचे ठरले. उपस्थित सर्व बांधवांचे आभार व्यक्त करत एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप संमेलन अध्यक्षांच्या भाषणाने झाला.

आयोजक
रामचंद्र बरफ (कोगदे)
महादू बरफ (कोगदे)
नरेश बरफ (डहाणू)
मिलिंद बरफ (न्याहाळे)
श्रावण बरफ (कोगदे)
कोगदे गावातील सर्व बरफ कुटुंब सदस्य
या स्नेहसंमेलनात महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दमण-दीव व गुजरात येथील बरफ कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने