दिंडोरी l प्रतिनिधी:- आज ग्रामपंचायत खडकसुकेणे येथे एकल, विधवा महिला, गावातील महिला यांचा हळदीकुंकू समारंभ चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या *मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत* ग्रामपंचायत महिलांविषयी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद नाशिक मा. श्री. ओमकारजी पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या नवचेतना अभियान या संकल्पनेतून खडकसुकेणे गावात हळदीकुंकू समारंभाला तालुक्याचे मा. श्री.भास्करजी रेंगडे सर गटविकास अधिकारी मा. भरतजी वेंदे सर सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला मा.श्री. भास्करजी रेंगडे सर BDO यांनी एकल विधवा महिला बाबत मार्गदर्शन करताना महिलांना समाजात वावरताना सन्मानाची वागणूक मिळणे महत्वाचे आहे प्लास्टिक बंदी, बचत गट, महिलांचे आरोग्य बाबत, शिक्षण याबाबत सविस्तर असे मोलाचे व महत्वपूर्ण असे मार्गदर्शन देखील केले. श्री. वेंदे सर यांनी यांनी विधवा एकल महिलांची सेंद्रिय शेती, mspra अंतर्गत आरोग्य शिक्षण बचत गट किती महत्वाचे आहे याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले
यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी ग्रा. प.सदस्य गावातील ग्रामस्थ व महिला भगिनी संपूर्ण महिला भगिनी मुख्याध्यापक, शिक्षक, कृषि सहाय्य्क, CHO, आशा अंगणवाडी ताई, CRP, बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी व शासकीय कर्मचारी उपस्थित होते