महाराष्ट्र ट्रायबल न्युज

नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदी श्री गुलाब भोये यांची एकमताने निवड

अलंगुण l प्रतिनिधी:- नाशिक जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये कोर कमिटीच्या शिफारशी प्रमाणे व सर्व संचालकांच्या माध्यमातून चेअरमन पदी श्री गुलाब पांडुरंग भोये व व्हा. चेअरमन श्रीमती ज्योती पवार यांच्या नावाची कोअर कमिटीच्या वतीने शिफारशी प्रमाणे एकमताने निवड करण्यात आली. मावळते चेअरमन श्री साईनाथ कालेकर व व्हा.चेअरमन श्रीमती स्नेहा नहीरे यांनी शुभेच्छा दिल्या. सदर निवडीबाबत कोर कमिटी तथा सहाय्यक कृषि अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री हरी गावित तसेच राज्य सरचिटणीस जयकीर्तिमान पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर आव्हाड, उप कृषि अधिकारी संघटनेचे श्री शरद थेटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने